जोवरी हे जग,जोवरी भाषण,तोवरी नूतन नित रामायण ॥आधुनिक वाल्मीकी महाकवी ग.दि.माडगूळकर यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकारलेल्या आणि ज्येष्ठ संगीतकार, गायक स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी त्यांच्या दैवी आवाजात गायलेल्या गीतरामायाणाला ५० वर्ष पूर्ण झाली.५० वर्षांच्या ह्या प्रवासाची सुरुवात १ एप्रिल १९५५ रोजी झाली.१ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ ह्या कालखंडात पुणे आकाशवाणीने अखंडितपणे गीतरामायणाचा कर्यक्रम प्रसारित केला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकात रामकथेचे वर्णन केले आहे. गदिमांनी ५६ गीतांमध्ये ही रामकथा शब्दबद्ध केली आहे.संपूर्ण ५६ गीतांसठी बाबूजींनी ३६ रागांचा वापर केला आहे.पुण्यातल्या शिवाजी मंदिरात गीतरामायणाचा कार्यक्रम चालू होता.बाबूजींची प्रेरणा स्वतंत्र्यवीर सावरकर त्यांच्या समोर बसले होते.बाबूजी आपल्या स्वरांमधून गाण्यामागचा अर्थ जिवंत करीत होते." नको आसू ढाळू आता पूस लोचनास !तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास !अयोध्येत हो तू राजा,रंक मी वनीचा ..."हे ऐकून तात्यांचा चेहरा जणू त्याचे तेजच विसरला.त्यांच्या नेत्रात अश्रू चमकले.गीतरामायणाच्या शब्दसामर्थ्याने खुद्द सावरकरसुद्धा हेलावले.हार्दिक स्वागत-- -- Best Regards,Mahesh Jamdade.
Wednesday, January 21, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment