प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून करायच नसतं
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं,
म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं
शाळा कॉलेजांत असच घडतंएकमेकांना बघीतलं
की मन प्रेमात पडतं जागेपणी
ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतंज्या वयात
शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतंकरीयरचं
सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतंसहाजीकचं
मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतंकारण
प्रेम करणं सोपं नसतंहॉटेल सिनेमागृहात
नेहमी जावं लागतंपैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतंमग
जागेपणीही स्वप्न दिसायला लागतंडोक्याला
ताप होऊन डोक दुखायला लागतं
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं................ -- --
Friday, January 23, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment