आज अचानक एकाएकी । मानस लागे तेथे विहरु
खेड्यामधले घर कौलारु ॥धृ॥पूर्व दिशेला नदी वाहते । त्यात बालपण वहात येते
उंबरठ्याशी येऊन मिळते । यौवन लागे उगा बावरु ॥१॥माहेरची प्रेमळ माती । त्या मातीतून पिकते प्रीती
कणसावरची माणिक मोती । तिथे भिरभिरे स्मृती-पांखरु ॥२॥आयुष्याची पाऊलवाटा । किती तुडविल्या येता जाता
परि आईची आठवण येता । मनी वादळे होति सुरु ॥
गीतकार : अनिल भारती
संगीतकार : मधुकर पाठक
गायक : मालती पांडे
गीत प्रकार : भावगीत

No comments:
Post a Comment