आनंदाचे डोही आनंदतरंग ।
आनंद चि अंग आनंदाचे ॥धृ॥काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥१॥गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥२॥तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment