Sunday, November 29, 2015

आरोपीचा पिंजरा (एका सत्य घटनेवर आधारीत) उल्हास हरी जोशी, मोः-9226846631

लहानपणापासूनच मला सतत आरोपीच्या पिंजर्‍यात उभे रहाण्याची सवय जडली आहे. मला आजपर्यंत अनेकांनी अनेकवेळा निरनिराळ्या आरोपांखाली आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. आणि गंमत म्हणजे जे मला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात तेच न्यायाधीश होऊन न्याय निवाडा करतात व मला निरनिराळ्या शिक्षा फर्मावतात.
मी आधीच सांगतो की मी कमी बुद्धी असलेला व अत्यंत सामान्य पर्सनॅलिटी असलेला एक अती सामान्य माणूस आहे. माझी पर्सनॅलिटी ‘बावळट’ या कॅटेगरीतली आहे. बुद्धीने म्हणाल तर शाळेत असताना दर वर्षी कसेतरी काठावर पास होत वरच्या वर्गात चढत गेलो. 36 टक्के मार्क मिळवून 10 वी व 40 टक्के मार्क मिळवून 12 वी पास झालो. पुढे ‘थर्ड क्लास बी.कॉम.’ अशी पदवी मिळवली व गावातील एका छोट्या बँकेत ‘टेम्पररी क्लार्क’ अशी सामान्य नोकरी मिळवली, ती सुद्धा वशिल्याने. थोडक्यात माझे आयुष्य तसे फालतुच आहे. याचा माझ्या वडिलांना फार राग यायचा व ते मला सारखे घालून पाडून बोलायचे, सतत अपमान करायचे. आता वडीलच असे करतात म्हटल्यावर बाकीचे काय गप्प बसणार? मी बावळट आहे. मी मूर्ख आहे. मला अजीबात अक्कल नाही. माझ्या तोंडावरची माशी सुद्धा हलत नाही. मला साध्या साध्या गोष्टी सुद्धा कळत नाहीत. मला हे येत नाही, ते येत नाही असे आरोप सतत माझ्यावर होत आले. मग या साठी मला ‘याला घरातून हाकलून द्या. याच्या चार मुस्कटात मारा. याच्याकडे लक्ष देऊ नका. याला रात्री उपाशी ठेवा’ अशा प्रकारच्या शिक्षा मला देऊन झाल्या. ‘याला उपाशी ठेवा’ ही माझ्या वडिलांची सर्वात आवडती शिक्षा! त्यामूळे कित्येक रात्री मी पाणी पिऊन उपाशी पोटी काढल्या आहेत.
अर्थात याला कारण आहे माझा स्वभाव. एखादी गोष्ट जोपर्यंत मला पटत नाही तो पर्यंत मला ती स्विकारता येत नाही. आता हेच बघाना. गणितामधे 1 अधीक 1 बरोबर 2 हे सर्वांनाच माहीत आहे. पण 1 अधिक 1 हे 2 नच कां, 3 का नाही किंवा 0 का नाही? इथेच गणिताची गोची झाली. इंग्रजीमधे I am आणि We are. I नंतर are का नाही किंवा we नंतर am का नाही? किंवा दोन्ही नंतर am किंवा are पैकी एकच का नाही? म्हणून इंग्रजीत दांडी. मराठीचे पण तसेच. आणि व पाणी. आणितला ण र्‍हस्व तर पाणीमधला णी दीर्घ असे कां? दोन्ही र्‍हस्व किंवा दीर्घ का नाही? त्यामूळे मराठीतपण बोर्‍या वाजलेला. लकांना माझे प्रश्न ‘स्टुपिड’ वाटायचे म्हणून मी मूर्ख! असो.
बँकेमधे मी कामाला लागलो ते क्रेडिट सेक्शनला! बँकेमधे जे ड्राफ्ट येतात ते त्या त्या अकाऊंटला जमा करायचे माझे काम. कुलकर्णी हे माझे बॉस होते. ते बँकेचे सिनियर ऑफीसर होते. गोगटे साहेब हे आमच्या बँकेचे मॅनेजर होते. माझा त्यांच्याशी फारसा संबंध यायचा नाही. ड्राफ्ट आला की मग त्याचे एक व्हाऊचर बनवून व त्यावर माझ्या व कुलकर्णी साहेबांच्या सह्या घेऊन तो पास झाला की मगच त्या ड्राफ्टची रक्कम त्या अकाऊंटला क्रेडीट व्हायची. आणि इथेच माझी व कुलकर्णी साहेबांची झकाझकी चालायची. कारण व्हाऊचर बनवताना माझा नेहमी गोंधळ उडायचा. लिखीत रक्कम व अक्षरी रक्कम यात नेहमी घोळ व्हायचा. लिखित रक्कम चार लाख असेल तर अक्षरी रक्कम 40 हजार असायची किंवा याच्या उलटे असायचे. त्यामूळे मला सारखी कुलकर्णी साहेबांची बोलणी खावी लागायची. ‘मी आहे म्हणून तु टिकला आहेस नाहीतर तुझी केव्हाच हकालपट्टी झाली असती’ हे कुलकर्णी साहेबांचे फार आवडते वाक्य. बँकेतील लोक कुलकर्णी साहेबांना फार घाबरायचे. तसा त्यांचा दराराच होता. त्यांच्यामूळे पूर्वी तिन चार लोकांची हकालपट्टी झाल्याचे ऐकीवात होते. गोगटे साहेब दोन वर्षांनी रिटायर होणार होते व त्यांच्या जागी कुलकर्णी साहेबांची वर्णी लागायची दाट शक्यता होती.
मी नोकरीला लागून दोन एक महिने झाले असतील. एके दिवशी बँकेत सुटाबुटातला पॉश माणूस आला. तो कुलकर्णी साहेबांचा मित्र होता. त्याने त्याच्या कंपनीच्या नावाने बँकेत अकाऊंट उघडले. कुलकर्णी साहेबांनी सगळी मदत केली. त्याने दहा हजार रुपयांचा एक ड्राफ्ट भरला. कुलकर्णी साहेबांनी तो ड्राफ्ट ताबडतोब पास करून ती रक्कम त्यांच्या अकाऊंटवर क्रेडीट करायला सांगीतली. पार्टीला गरज होती म्हणून त्यांनी आठ हजार रुपये ताबडतोब काढून पण घेतले. त्यानंतर त्या पार्टिच्या नांवाने रोज ड्राफ्ट जमा होऊ लागले. आधी ते 5 हजार, 10 हजार अशा किरकोळ रकमांचे असायचे पण पुढे पुढे रकमा वाढत वाढत लाखांच्यावर गेल्या. कुलकर्णी साहेबांचे या ड्राफ्टवर खास लक्ष असयचे. ड्राफ्ट बँकेत भरला गेला की तो ताबडतोब क्रेडीट व्हायला हवा अशा मला त्यांच्या ‘स्टिक्ट इन्स्ट्रक्शन’ होत्या. ड्राफ्ट क्रेडिट झाल्यावर ताबडतोब त्याचे पैसे काढले जातात हे माझ्या धान्यात आले होते. पण का कुणासठाऊक पहिल्यापासुनच हे ड्राफ्टबद्दल मला कसला तरी संशय वाटत होता. यात काहीतरी गडबड आहे असे वाटत होते. मी एक दोन वेळेला ही गोष्ट कुलकर्णी साहेबांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला पण उलट त्यांनीच मला झापडले.
आता त्या पार्टीच्या नावाचा 22 लाख रुपयांचा ड्राफ्ट माझ्याकडे आला व त्यात मला खाडाखोड आढळली. मी तो ड्राफ्ट पास न करता बाजुला ठेऊन दिला. मधे दोन तिन दिवस असेच गेले. त्यामधे एक सुट्टीचा दिवस पण होता. तिसर्‍या दिवशी सकाळी सकाळीच कुलकर्णी साहेब माझ्याकडे आले ते रागाने लालबुंद होऊनच. मी ताबडतोब तो 22 लाखांचा ड्राफ्ट पास करून क्रेडीट का केला नाही म्हणून मलाच झापडु लागले. मी पण वैतागलो होतो. ‘त्या ड्राफ्टमधे काहीतरी गडबड आहे. मी तो पास करणार नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्हीच तो पास करा!’ मी कुलकर्णी साहेबांनात सांगीतले. हे ऐकुन ते चांगलेच खवळले. ‘तु स्वतःला काय समजतोस रे भडव्या! थांब मी आता तुला चांगलाच इंगा दाखवतो.’ असे बडबडत ते तडक गोगटे साहेबांच्या केबीनमधेच घुसले. आज पहिल्यांदाच कुलकर्णी साहेब मला ‘भडव्या’ म्हणाले होते. आता माझे काही खरे नाही, माझी आता गच्छंती होणार हे आता अटळ आहे याची सर्वांना जाणीव झाली होती. खाटकाकडे नेणार्‍या कोकराकडे लोक जसे सहानुभूतिने बघत असतात त्याच नजरेने आता माझे सहकारी माझ्याकडे बघत होते.
थोड्याच वेळात कुलकर्णी साहेब केबीनंधून बाहेर आले ते विजयी हास्य घेऊनच. थोड्याच वेळात मला गोगटे साहेबांचे बोलावणे आले. ते पण बरेच रागावलेले दिसत होते. ‘ही ड्राफ्टची काय भानगड आहे?’ त्यांनी रागानेच विचारले. मी काय ती भानगड त्यांना सांगीतली. ‘तो ड्राफ्ट घेऊन या!’ ते मला म्हणाले. मी तो 22 लाखांचा ड्राफ्ट घेऊन त्यांचोकडे गेलो व मला आलेल्या शंका त्यांना बोलुन दाखवल्या. ‘जरा थांब’ म्हणून त्यांनी कोणालातरी फोन केला. फोनवर त्यांचा मित्रच असावा. कारण आधी ते हसुन बोलत होते पण ड्राफ्टचा विषय काढताच ते एकदम गंभीर झाले. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमू लागले. त्यांनी मला केबीनमधे थांबायला सांगीतले व भराभरा कुठे कुठे फोन करायला सुरवात केली. ते फोनवर अगदी खालच्या आवाजात बोलत होते. त्यांनी मला बाहेर जाऊन शांतपणे बसायला सांगीतले. काही वेळातच एक पोलिस व्हॅन बँकेसमोर येऊन उभी राहिली. त्यातुन एक पोलिस इन्स्पेक्टर, चार पोलिस व टाय लावलेले एक गृहस्थ उतरले. सगळेजण बँकेत शिरले व पोलिस इन्स्पेक्टर व टाय लावलेले गृहस्थ गोगटे साहेबांच्या केबीनमध्ये शिरले. थोड्याच वेळात गोगटे साहेबांनी बँकेचे कामकाज बंद करायला व बँकेचे दरवाजे बंद करायला सांगीतले व ‘मी सांगीतल्याशीवाय कोणीही घरी जायचे नाही’ असे सक्त फर्मान काढले. हा सगळा गोंधळ बघुन आम्ही हादरुनच गेलो होतो. कारण या आधी बँकेत पोलीस कधीच आले नव्हते. गोगटे साहेबांनी मला लगेच केबीनमधे बोलावले. टाय लावलेले गृहस्थ पोलिसांच्या क्राईम ब्रँचचे एक मोठे अधीकारी होते. मी गोगटे साहेबांना दिलेला 22 लाखांचा ड्राफ्ट त्यांच्या हातात होता. तो बोगस असल्याचे ते सांगत होते. मला आलेल्या शंका बरोबर असल्याचे ते सांगत होते. मला त्या पार्टीच्या नावाने आधी आलेले ड्राफ्ट पण आणायला सांगीतले. मी ते ड्राफ्ट आणायला स्ट्रॉंग रुमकडे जाताना सहज पाहिले तर कुलकर्णी साहेबांचा चेहेरा प्रचंड घाबरलेला दिसत होता. ते फोनवर कुणाशीतरी हळू आवाजात पण भरभर बोलत होते. मी त्या पार्टीने जमा केलेले सगळे ड्राफ्ट गोगटे साहेबांपूढे ठेवले. ते सगळे बोगस निघाले. या बोगस ड्राफ्टच्या रुपाने कुलकर्णी साहेबांच्या या सुटाबुटातील मित्राने आमच्या बँकेला 32 लाखांचा चुना लावला होता व अजून 22 लाखांचा चुना लावायला निघाला होता. यात कुलकर्णी साहेबांचा पण हात होता असे पोलिसी खाक्या दाखवताच आढळून आले. तेवढ्यात बँकेचे चेअरमन व एम. डी. पण येऊन पोचले होते. कुलकर्णी साहेबांना अटक तर झालीच पण त्यांना सस्पेन्ड पण करण्यात आले.
दोन दिवस बँकेतील वातावरण तंग होते. आता माझी पाळी होती. कारण माझ्या पण व्हाऊचरवर सह्या असल्यामूळे मी पण या फ्रॉडमधे सामील आहे असे कुलकर्णी साहेब वारंवार जीव तोडून सांगत होते. कामात मी कसा गलथान आहे याचा पाढा पण त्यांनी वाचून दाखवला होता. त्यामूळे माझी पण गच्छंती अटळ आहे असे मला वाटत होते. गोगटे साहेबांचे बोलावणे आले आणि फाशीच्या तख्तावर जाणार्‍या कैद्यासारखा मी त्यांच्या समोर उभा राहीलो. आता ते टर्मीनेशची ऑर्डर केव्हा देतात याची मी वाट पहात होतो.
‘तुमची कुलकर्णींच्या जागी नेमणूक करण्यात आली आहे’ ते म्हणाले तेव्हा मी उडालोच. ‘साहेब मी टेम्पररी क्लार्क. थर्ड क्लास बी.कॉम.!’ मी कसेतरी पुटपुटलो. ‘तुमच्यामूळे बँकेतले एक मोठे फ्रॉड सापडले. तुम्ही बँकेला संकटातून वाचवलेत. आजपासून तुमचे सिनियर ऑफीसर म्हणून प्रमोशन करण्यात येत आहे. तसेच तुम्हाला नोकरीत पर्मनन्ट करण्यात येत आहे. ही घ्या त्याची ऑफीस ऑर्डर. दुसरी गोष्ट. आपल्या बँकेने पण सायबर सेल काढायचे ठरवले आहे. त्याचे प्रमुख म्हणून तुमची निवड करावी अशी शिफारस मी केली आहे. बँकेत परत अशी फ्रॉड होऊ नयेत यासाठी हा सायबर सेल काढण्यात येत आहे. बेस्ट ऑफ लक.’ सायबर सेलचा प्रमुख मी त्यानंतर पाच फ्रॉडची प्रकरणे उजेडात आणली. याचा फायदा असा झाला की लोक मला आरोपीच्या पिंजर्‍यात आता उभे करत नाहीत.
हे कशामूळे घडले? एखादी गोष्ट जो पर्यंत मला पटत नाही तो पर्यंत स्विकारायची नाही व प्रश्न, मग ते कितीही ‘स्टुपीड’ का असेनात, विचारायला घाबरायचे नाही हा माझा स्वभाव. किंवा ती माझी ‘ओरिजिनॅलिटी’ आहे म्हणाना!
देवाने प्रत्येकालाच काही ना काही तरी ‘ओरिजिनॅलिटी’ ही दिलेलीच असते. ती एक दैवी देणगीच असते. पण बरेच जण आपल्या या ‘ओरिजिनॅलिटी’ चा र्‍हास तरी करततात किंवा घालवून तरी बसतात. असे करू नये. कारण शेवटी मला माझ्या ‘ओरिजिनॅलिटी’ नेच आधार दिला.
पण शेवटी आपली ‘ओरिजिनॅलिटी’ टिकवून ठेवायची की नाही हा ज्याचा त्याचा वैय्यक्तिक प्रश्न आहे नाही का?
तुम्हाला काय वाटते?
(संदर्भः-
एनरॉन ही एनर्जी व पॉवर जनरेशन क्षेत्रातली एक नावाजलेली व दिग्गज अमेरिकन कंपनी. 1985 साली स्थापन झालेली ही कंपनी 2004 साली पत्यांचा बंगला कोसाळावा तशी कोसळली. इतकेच नव्हे तर ऑर्थर अँडरसन या एका आघाडीच्या सि.ए. फर्मला पण गाशा गुंडाळावा लागला. हे सगळे घडले ते आर्थिक घोट्याळ्यांमूळे. आणि हे उघडकिला आणले ते अकाऊंट सेक्शनमधे क्लार्कचे काम करणार्‍या एका सर्वसामान्य महिलेले. खोटे हिशोब दाखवणे, आस्तित्वात नसलेल्या कंपन्यांमधे गुंतवणूक केल्याचे दाखवून सरकारी कराची चोरी करणे, कंपनीचा रेव्हेन्यु कृत्रीम रित्या फुगवून दाखवणे, या जोरावर स्टॉक मार्केटमधे कंपनीच्या स्टॉकची किंमत वाढवणे व त्याचा वैय्यक्तिक स्वार्थासाठी फायदा करून घेणे असे अनेक आरोप कोर्टात सिद्ध झाले. याबद्दल कंपनीचे प्रमुख केनेथ ले यांना 65 वर्षांची शिक्षा होणार होती. या आधीच त्यांचे निधन झाले पण त्यांची बायको रस्त्यावर आली. तसेच कंपीच्या अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना दिर्घकाळाच्या सक्षम कारावासाच्या शिक्षा झाल्या आहेत. कोर्टामधे या महीलेची साक्ष अत्यंत महत्वपूर्ण ठरली. तिने साक्ष देऊ नये म्हणून तिच्यावर दडपण आणण्यात आले. तिला प्रलोभने दाखवली गेली. इतकेच नाही तर तिला व तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. पण ती या कशालाही बधली नाही. कोर्टामधे अमेरिकेतील अनेक बड्या बड्या वकीलांची फौज तिच्याविरुद्ध उभी करण्यात आली. तिची साक्ष खोटी पाडण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आज ही महिला अमेरिकेची ‘हिरो’ आहे.)

Friday, November 27, 2015

महाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज : डा. नरेंद्र दाभोळकर

चार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. "हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा?" अशी सुरुवात करून बराच वेळ बोलत होते. बार्टीच्या वतीने  {डा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण  संस्था, पुणे}" महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मुलन विचाराची वाटचाल" या विषयावरील पुस्तक ते संपादीत करीत होते.त्यासाठी मी "सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक चळवळीचे अंधश्रद्धा निर्मुलनातील योगदान " हा लेख द्यायचे कबूल केलेले होते. गेल्या दोन महिन्यात पाठपुराव्यासाठी त्यांची पत्रे आणि फोन आले होते.
नरूभाऊंचा स्वभाव  अतिशय आर्जवी आणि संयमी होता. ते  काटेकोर शिस्तीचे होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांच्या तोडीचा उत्तम संघटक दुसरा सापडणे केवळ अशक्य.त्यांची जुन्याजाणत्यांपासून युवा पिढीतील अनेकांशी गट्टी होती.आपल्या विचारांशी ते ठाम असले तरी कोणताही टोकदार मार्ग ते टाळत असत. कायम आपले म्हणणे अत्यंत विनयपुर्वक, युक्तीवादाच्या आधारे मांडीत असत. त्यांच्यासारख्या ऋजु स्वभावाच्या नेत्यावर खुनी हल्ला व्हावा हे भयानक आहे. हादरवणारे, सुन्न करणारे आहे. फुले, शाहू. आंबेडकर, आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज कोणीही विवेकी माणूस सुरक्षित आहे असे वाटत नाही.
अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे ते एक महत्वाचे नेते  होते. शाम मानव यांच्यासोबत काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केले. गेली १८ वर्षे राज्यात अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा विरोधी विधेयक संमत व्हावे म्हणून दाभोळकर झटत होते. हे विधेयक त्वरित पारित करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.
राज्याच्या पुरोगामी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता आज आपण गमावला आहे. विवेकवादाचा आवाज दाबण्यासाठी कार्यरत असलेल्या विचारशत्रूंनी ही हत्त्या केली असावी असे वाटते. गेली अनेक वर्षे ते "साधना" साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी या साप्ताहिकाला एक नवे कलदार आणि कसदार रूप प्राप्त करून दिले. ते अतिशय प्रभावी वक्ते आणि लोकप्रिय क्रिडापटू होते. कबड्डी या खेळातील ते राज्यपातळीवरील नामवंत खेळाडू होते. सामाजिक कृतज्ञता निधी आणि महाराष्ट्र फौंडेशनचे समन्वयक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने आज पुरोगामी चळवळीचा आवाज हरपला आहे.
अंधश्रद्धा निर्मुलनाचा त्यांनी ध्यास घेतलेला होता.ते या चळवळीचे जणू प्रतिकच बनले होते. त्यांची या विषयावरील असंख्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. नरूभाऊ हे मुळात सातार्‍यातील एक नामवंत डाक्टर. लक्ष्मण माने, वर्षा देशपांडे आदींना सातार्‍यात आणून सामाजिक कामात उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.समतावादी चळवळीत सक्रीय झाल्यानंतर त्यातच ते इतके गुरफटून गेले की वैद्यकीय व्यवसायासाठी वेळ देणे त्यांना शक्य झाले नाही.
मी शाळकरी वयात त्यांच्या भाषणांचा चाहता होतो.१९८२ साली नामांतर आंदोलनात  त्यांच्यासोबत ठाण्याच्या तुरुंगात  एकाच कोठडीत असताना त्यांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला.त्यांच्याशी रात्रंदिवस मारलेल्या गप्पा आजही स्मरणात आहेत. ते आमचे हिरो होते. समता आंदोलन या संघटनेत त्यांच्या नेतृत्वाखाली मी काही वर्षे काम केले.मी साधनेत अधूनमधून लिहित असे.ते साधनाचे संपादक झाले तेव्हा प्रा. रामकृष्ण मोरे यांनी राज्यात पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला.त्याला प्रचंड विरोध झाला.स्वत: नरूभाऊ त्याच्या जबरदस्त विरोधात होते. मी मात्र या निर्णयाचा समर्थक होतो. त्यांनी साधनेचा एक विशेषांक त्यावर काढला. त्यात दुसरी बाजू यायला हवी म्हणून मी लेख लिहावा किंवा शिक्षण मंत्र्यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यावी असे नरूभाऊंनी सुचवले. अवघ्या दोन दिवसात हे करायचे होते.त्या मुलाखतीसाठी मी खूप आटापिटा केला होता. मी घेतलेली मोरेसरांची मुलाखत पुढे अत्यंत गाजली.पहिल्यांदा मोरेसर मुलाखत द्यायला तयारच नव्हते. साधना हे साप्ताहिक  मूठभर लोक वाचतात, त्यात मुलाखत दिली काय नी नाही दिली काय, काय फरक पडतो? असे त्यांचे मत होते. आज दाभोळकरांनी प्रचंड परिश्रमाने साधनेला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि उंची बघायला मोरेसर असते तर ते नक्कीच चकीत झाले असते.साधना बालदिवाळी अंकाचा लाखभर खप ही मोठी गोष्ट आहे. . नरूभाऊंचा एकखांबी तंबू नव्हता. युवा संपादक म्हणून विनोद शिरसाठ या युवकाला नरुभाऊंनी आपल्या तालमीत तयार केले. तो साधना उत्तम चालवित आहे.
नरूभाऊ तत्वनिष्ठ असले तरी अव्यवहारी नव्हते. मिडीयाचे ते डार्लिंग होते. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची किमया त्यांना साधलेली होती.अनेक ख्यातनाम व्यक्तींशी जुळवून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली होती. त्यांच्या नाना तर्‍हा सांभाळण्यात नरूभाऊ वाकबगार होते. एक ना धड भाराभर चिंध्या असे मात्र त्यांनी कधीही केले नाही. गेली २५ वर्षे चिकाटीने त्यांनी "अनिस"चे काम लावून धरले. अनेक बाबा,बुवांचे भंडाफोड केले.आम्ही मात्र त्यांना गमतीने नरेंद्र महाराज दाभोळकर म्हणत असू. औरंगाबादला  त्यांच्यावर आणि डा.श्रीराम लागूंवर हल्ला झाला तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी डा. लागूंचा हल्लेखोरांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यासोबत चार रट्टे मीही खाल्ले आहेत.
नरूभाऊ फार चाणाक्ष होते. आमच्या चळवळीचे ते चाणक्यच होते. अत्यंत धोरणी आणि हिशोबी. १४ वर्षांपुर्वी राज्यातल्या एका बड्या मुत्सद्दी आणि धूर्त नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या  काळात भल्याभल्यांना कामाला लावले होते. "लोकशाही प्रबोधन व्यासपीठ" ची उभारणी करून लोकशाही, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष शक्तींना मतदान करा असे सांगण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता. नरूभाऊ आमचे सारथी होते. डा.लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर या बड्या ग्ल‘मरवाल्या लोकांसोबत एक लिंबूटिंबू म्हणून मीही असायचो. राज्याच्या सर्व प्रमुख शहरातील  ह्या सभा फार गाजल्या. पुढे अनेक वर्षे आम्हाला या सभांचा खरा सूत्रधार माहितच नव्हता. बर्‍याच वर्षांनी आपल्याला कोणी कामाला लावले याची निळूभाऊंना कुणकूण लागली. डाक्टरांचे सगळ्या राजकारण्यांशी मधुर संबंध असत. कोणाला भेटायला जाताना कोणाचा उपयोग करून घ्यायचा याचे त्यांचे गणित अचूक असे. ते राजकारण्यांच्या सोबत असत. आणि तरीही त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून त्यांच्यावर ते तुटूनही पडत.
सामाजिक कार्यकर्त्यांना दरमहा काही आर्थिक पाठबळ देता यावे या हेतूने "सामाजिक कृतज्ञता निधी" जमा करायचे ठरले. बाबा आढाव, पुष्पा भावे आदींनी त्यासाठी "लग्नाच्या बेडीचा" दौरा आखला. त्या नाटकात तनुजा, लागू, निळूभाऊ, सुधीर जोशी असे अनेक दिग्गज भुमिका करीत होते. दौर्‍यात या सर्वांची सोय करणे हे सोपे काम नव्हते. नरूभाऊच ते काम करू जाणेत.नरूभाऊंनी हा "साकृनि"आजवर सांभाळला.
अमेरिकेच्या सुनिल देशमुख यांच्याशी नरूभाऊंची मैत्री होती.  महाराष्ट्र फौंडॆशनचे ते गेली काही वर्षे समन्वयक होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. मात्र सगळ्याच कामात शक्ती खर्च करण्याऎवजी दोनतीन ठिकाणीच त्यांनी सगळी शक्ती केंद्रीत केलेली होती.आणि ती कामे चिकाटीने लाऊन धरलेली होती.त्यामुळे त्या कामांवर ते आपला ठसा उमटवू शकले. त्यांची ही मोहर{मुद्रा} अखंड राहील.
नाशिकच्या एकनाथ कुंभारकरने आंतरजातीय विवाह केलेल्या नऊ महिन्यांच्या गरोदर मुलीची,प्रमिला कांबळेची निर्घृण हत्त्या केली.जातपंचायतीच्या दहशतीमुळे त्याने हे अघोरी कृत्य केले. अनेकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला.नरुभाऊंचे टायमिंग फार अचुक असे. नरुभाऊंनी नाशिकला तातडीने मोर्चा संघटित केला. परिषद लावली.परवा लातुरलाही "जातीला मूठमाती द्या" ही परिषद घेतली. त्यानिमित्ताने मी त्यांच्याशी चर्चा करीत होतो. जाती संघटना आणि जात पंचायती यांचे पोशिंदे राजकारणी आहेत, निवडणुकीत जातीचे गठ्ठा मतदान मिळावे म्हणून ते याला रसद पुरवतात, त्यांच्यावरच हल्ला करायला हवा असे माझे मत होते, आहे.नरूभाऊ म्हणाले, "हे करण्याएव्हढे आपण शक्तीशाली नाही.ते करायचे तर "पर्यायी राजकारण" करावे लागणार.आजतरी तसे करणे मला परवडणारे नाही."
मध्यंतरी मी संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडॆकर यांच्या जातीद्वेश पसरवणार्‍या पुस्तिकांचा साधार पंचनामा करणारे लेख लिहिले. सर्व ब्राह्मण पुरुष जातीय दंगली घडवून जाळून किंवा कापून मारण्याच्या खेडॆकरांच्या भुमिकेचा पर्दाफास केला.ते लेख मी साधनाकडे पाठवले.सतत सावधचित्त असणार्‍या नरूभाऊंनी मराठा संघटनांच्या दहशतीमुळे हे लेख छापायला चक्क नकार दिला.नरुभाऊ धाडशी होते,पण ते धाडस हिशोबी होते हे मला कळून चुकले. त्यांची आज हत्त्या व्हावी हे चिंताजनक आहे. निषेधार्य आहे.
सत्यशोधक समाजाचे अधिवेशन आम्ही नगर जिल्ह्यात लावले होते. नरुभाऊंनी शनी शिंगणापुरला घराला कुलुपे नाहीत,चोर्‍या होत नाहीत या अंधश्रद्धेवर आघात करण्यासाठी, त्याचवेळी "चला चोर्‍या करायला, चला शिंगणापुरला" अशी मोहीम घोषित केली. आमच्या परिषदेवर संकट आले.आम्ही चिडलो. "त्यांनी हीच वेळ का निवडली? अंधश्रद्धा वाईटच आहेत पण चोर्‍या करणे नैतिक कसे?" यावर माझा त्यांचा कडाक्याचा वाद झाला.चळवळीतील अंतर्गत वादावर बहुधा भुमिका न घेण्याचे व त्याद्वारे अजातशत्रू राहण्याचे कौशल्य त्यांना साधलेले होते.
व्यक्तीची हत्या करून विचारांची हत्त्या होत नसते.उलट विचार अधिक मजबूत होतात.शहीद डा. नरेंद्र दाभोळकर अमर झाले आहेत. अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा तातडीने मंजूर करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

Chandrashekhar Gokhale

(आग्रहाखातर)
आई लहनपणी आम्हाला एका खेडुताची गोष्ट फार रंगवून सांगायची...
साधाभोळा खेडूत त्यावेळचा तो काळ, प्रवास म्हणजे पायपीटी शिवाय पर्याय नसायचा..मग आई प्रमाण द्यायची अरे इथनं साधं भागवत मावशीकडॆ जायला दिवस लागायचा.. दिवसभर चाललायचं तिन्हिसांज झाली की जवळपास पडकं देऊळ बघून मुक्काम करायचा.. ते पडकं देऊळ बहुदा मारुतीचंच असायचं..मग तिथेच एक आडोशाची जागा बघून जरा झाडून बिडून घ्यायची.. मग बरोबर आणलेली शिदोरी काढायची..मीठ मिरची, कोरडा भाकर तुकडा चवीला गुळाचा खडा..
.देवाला नैवेद्य दाखवला की त्या मिणमिणत्या प्रकाशात चार घास खायचे आणि लोट्यातलं पाणी पिऊन तिथेच आडवं व्हायचं.. दमलेल्या देहाची कधी मुटकुळी व्हायची हे त्याचं त्यालाही कळायचं नाही.. पाहटे जाग आली, देवाच्या पाया पडलं की पुन्हा पायपीटीला सुरुवात..तर असा एक खेडूत मजल दर मजल करत तिन्हिसांजेला एका टुमदार गावाच्या वेशीपाशी पोहोचतो..जवळची शिदोरी संपत आलेली असते चालून चालून पाय तुटायची वेळ आलेली असते दिवसही चांगला कललेला असतो.. आता अंधारात ठेचकाळत पुढे जाण्यात काही राम नसतो.. त्या पेक्षा इथेच कुणाला विनंती करून त्याच्या ओसरीत अंग पसरावं आणि रात्र ओसरली की पुढचा रस्ता धरावा अशा तो सुद्न्य विचार करतो
त्या विचारात चालत असताना त्याला एक टूमदार वाडा दिसतो..बरीच चेहेल पेहेल त्या वाड्यात दिसते कसलं तरी शुभकार्य त्या वाड्यात होणार असतं तिथली लगबग बघून याचा थकवा कुठल्याकुठे पळून जातो नर नारी नटून थटून मिरवत असतात.. त्यांच्या समोर हा म्हणजे अगदीच... त्या बि चार्‍याशी बोलायला काय साधं त्याचं म्हणणं ऐकायला कोणाला वेळ नसतो.. त्याचा साधा प्रश्न असतो.. या वाड्याचा धनी कोण? म्हणजे त्याची परवांगी घेऊन हा आपली पथारी वाड्याच्या एका कोपर्यात पसरणार असतो, पण छे! कोणी त्याच्याकडॆ बघायला तयार नसतं..तो खूप विचार करतो परवांगी नं घेता आश्रय घेणं त्याला रास्त वाटत नाही त्याचही बरोबरच असतं सामान्य माणूस अपमानाला फार भितो.. जेंव्हा आमच्याकडे राहयला घर नव्हतं तेंव्हा... असो!
तर खूप विचार केल्यावर त्याला एक जगावेगळी कल्पाना सुचते तो अंगणातला एक भलामोठा धोंडा दिवाणखान्यात मधेच आणून ठेवतो आणि गम्मत बघत कोपर्‍यात उभा राहतो... लोक येत असतात जात असतात इकडून तिकडे तिकडून इकडे उगीच घाई दाखवत फिरत असतात ज्याला त्याला त्या धोंड्यची अडचण होते.. दखल प्रत्येकजण घेतो कोणी चरफडतं कोणी अडखळतं कोणी दुसर्‍याला तो धोंडा बाजुला फेकायचा हुकुम सोडतं पण वाकून तो धोंडा उचलायची तसदी कोणी घेत नाही
तेव्हढ्यात एकजण येतो असा मधोमध धोंडा बघून हातातलं सामान बाजुला ठेवत अरे हा धोंडा इथे कोणी ठेवला असं तोंडाने पुटपुटत वाकतो आणि तो धोंडा उचलायला जातो तो धोंडा उचलतो आणि बाहेर टाकयला जात असताना हा खेडूत घाईने पुढे येतो आणि त्याच्या हातातून धोंडा घेत विचारतो.. या वास्तूचे तुम्ही मालक ना? या घराचे कर्ते पुरुष?.. मालक हो म्हणत विचारतो.. तुम्ही कसं ओळखलत?.. खेडूत म्हणतो धोंडा मीच हीतं ठ्येवला...मालक चकीत होत त्याच्याकडे बघायला लागतो तसा तो वरमून हसत म्हणतो.या वाड्याचा धनी हुडकत होतो जी स्मदेजन तालेवार खरा मालक कसा वळकणार?..म्हणून हा उपाय क्येला... धा डझन माणसं हितनं तिथे गेली तिथस्न हिते आली सम्द्यानी हा धोंडा पायला दात वोट बी खाल्ले पर उचलायची तसदी कोणी घेईना झालं पर तुम्ही आलासा आणि काळजीपोटी कोणाची बी वाट नं बघता हातातलं काम टाकून तुम्ही धोंडा उचलायला वाकलासा जी काळजी मालकाला वाटल ती आलेल्या पै पाहुण्याला वाटल का? मालकाला त्या खेडुताचं भारी कौतूक वाटतं एकतर त्याची हुशारी दुसरा त्याचा प्रामाणीकपणा.. नाहीतर इतक्या मोठ्या वाड्यात इतक्या गोतवळ्यात तो सहज खपून गेला असता.. एका रात्रीचाच तर प्रश्न होता... तो मालक दिलदार असतो कार्य पार पडेपर्यंत त्याला ठेऊन घेतो मानपान करतो..मा~रल आफ द स्टोरी काय जी काळजी घरच्या मालकाला घरा बद्दल वाटेल ती परक्याला वाटेल का?
ही घरी नाहिये म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली.. नाहीतर ही तत्परतेने म्हणेल हे मा~रल बिरल तुम्हाला लागू होत नाही... तुम्ही त्या वाड्यचे मालक असता तर त्या बिचार्या खेडुताला बाप जन्मात कळलं नसतं त्या वाड्याचे मालक कोण ते..

द्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले

द्रष्टा महापुरूष महात्मा जोतीराव फुले


महात्मा जोतीराव फुले यांच्या निधनाला आज १२५ वर्षे झाली. त्यांच्या काळात त्यांनी केलेले काम महत्वाचे असेलही, परंतु आज त्याचा काय उपयोग? किती वर्षे आम्ही केवळ आरत्याच ओवाळायच्या? संभाजी ब्रिगेड, बामसेफ यासारख्या स्वत:ला फुले -आंबेडकरवादी म्हणऊन घेणार्‍या संघटना फुले ब्राह्मणद्वेष्टे होते असा सरसकट प्रचार करीत असतात. काही चतुर राजकारणी नित्यनेमाने फुले -आंबेडकरांचा महाराष्ट्र असा जयघोष करून जातीच्या मतब्यांका मजबूत करीत असतात. संभाजी भिडे, सनातनचे जयंत आठवले, सोबतचे बाळ गांगल आदी लोक तर फुले राष्ट्रविरोधी होते असे सांगत, लिहीत असतात.
खरेच फुले होते तरी नेमके कोण?

जोतीरावांनी १८४८ मध्ये स्त्रीशिक्षण आणि दलितांच्या शिक्षणाची सर्वप्रथम व्यवस्था उभारली. घरातला हौद दलितांसाठी खुला केला. बालविवाहविरोध, विधवाविवाहाला प्रोत्साहन आणि सतीप्रथेला विरोध केला इत्यादी गोष्टी आपण वाचलेल्या असतात. पण आज हे सारे प्रश्न तर सुटलेले आहेत, अशावेळी फुल्यांची प्रस्तुतता काय? असा प्रश्न पडणेही स्वाभाविक होय.

जोतीरावांनी सर्वांना शिक्षण, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन,संसाधनांचे फेरवाटप, ज्ञाननिर्मिती,धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम केले. ख्यातनाम विचारवंत डा. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे. डा.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुल्यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानाने सांगायचे. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी  म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा थे."  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे.

जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या बारा वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक असले तरी त्यांनाही काळाच्या मर्यादा होत्याच. आज त्यांच्याकडे बघताना त्यांचा स्वभाव, सवयी आणि पिंड यांच्यामुळे निर्माण झालेल्या तत्कालीन काही बाबींवर भर द्यायचा की त्यांचा कालातीत वारसा शोधायचा याचा विवेक करायला हवा. आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही फुल्यांकडून आपल्याला मिळण्याची शक्यता आहे काय? असल्यास किती आणि कोणत्या याचा विचार करायला हवा.

नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुल्यांनी १८७३ साली  [१४२ वर्षांपुर्वी ] लिहिलेल्या "गुलामगिरी" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुल्यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्याने दिडशे वर्षांपुर्वी विचारांचे जागतिकीकरण केलेले होते.
 भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून घटना दुरूस्ती करून शिक्षण हक्काचा कायदा २००९ साली केला. जो आपल्याकडे २०१० साली लागू करण्यात आला. मात्र ज्याची पुरेशी अंमलबजावणी अद्यापही होत नसल्याच्या तक्रारी येत असतात. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक करावे अशी मागणी जोतीरावांनी हंटर शिक्षण आयोगासमोर १९ आक्टोबर १८८२ रोजी लेखी स्वरूपात केलेली होती.
अशी मागणी करणारे ते केवळ देशातीलच नव्हे तर आशिया खंडातीलही पहिले शिक्षणतज्ञ होते. त्यांनी १८५० च्या काळात आपल्या सर्व शाळांमध्ये औद्योगिक शिक्षण आणि शेती शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली होती अशी माहिती ब्रिटीश सरकारच्या शिक्षण खात्याच्या अहवालात सापडली आहे. " Industrial Department should be attached to the schools in which children would learn useful trades and crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independently." तंत्रशिक्षण आणि शेती शिक्षण सर्व शाळांमध्ये मुलांमुलींना वयाच्या ६ व्या वर्षापासून सक्तीचे करण्यात यावे अशी मागणी त्यांनी अनेकवार केल्याचे दिसते. ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती आणि कौशल्याधारीत शिक्षण दिले तरच नवी पिढी स्वत:च्या पायावर स्वतंत्रपणे उभी राहील आणि मजेत व आनंदाने जगू असे प्रतिपादन त्यांनी सरकारकडे केल्याचे आढळून येते.
शैक्षणिक गळतीचा प्रश्न कसा सोडवायचा याची मांडणी करताना १८५४ साली त्यांनी प्रौढ स्त्री - पुरूषांचे साक्षरता अभियान सुरू केलेले होते. उपस्थिती भत्ता, पोषण आहार, विद्यावेतन या योजना त्यांनी राबवलेल्या होत्या. जोतीराव - सावित्रीबाईंच्या चौथीच्या वर्गातली मुक्ता साळवे मांगामहारांच्या दु:खाविषयी जो १८५५ साली निबंध लिहिते त्यातून दलित साहित्याची पायाभरणी होते. त्यांची विद्यार्थिनी ताराबाई शिंदे, "स्त्रीपुरूष तुलना" हा ग्रंथ लिहून स्त्रीवादी साहित्याचे जागतिक दालन सुरू करते. तान्हुबाई बिर्जे ही पुढे [ १९०६ ते १९१२ या काळात ] पहिली भारतीय महिला संपादक बनते. सावित्रीबाई आणि जोतीराव हे त्यांच्या भिडे, वाळवेकर, गोवंडे, परांजपे, लहुजी साळवे, राणबा महार, गणू शिवाजी मांग, धुराजी अप्पाजी चांभार, उस्मान व फातिमा शेख आदी सहकार्‍यांसोबत दोन शिक्षण संस्था स्थापन करून अठरा शाळांमधून ज्ञानसत्तेच्या क्षेत्रात जे काम करीत होते ते समजाऊन घेतले तर आजच्या दुषित शैक्षणिक पर्यावरणाला उर्जा मिळू शकेल इतके मुलभूत काम होते ते.

जोतीराव प्रगतीशील शेतकरी होते. शेतीमालाला उत्पादनखर्च भरून येईल आणि किमान १५ ते २० टक्के नफा मिळेल एव्हढा  बाजारभाव मिळाला पाहिजे, शेतकर्‍यांना पिकांसाठी पुरेसे आणि बारमाही पाणी सिंचनासाठी मिळाले पाहिजे, ते वाया जाऊ नये म्हणून नळाद्वारे देण्यात यावे, आधुनिक पद्धतीच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी शेतकर्‍यांना सरकारने परदेशात पाठवावे यासारख्या त्यांनी  ’शेतकर्‍याचा असूड’ या ग्रंथात १८८३ साली केलेल्या सुचना आजही मार्गदर्शक आहेत. शेतकरी सुखी व्हायचा असेल तर त्याची त्रिसूत्री फुले मांडून दाखवतात.
१) उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव शेतीमालाला मिळाला पाहिजे.
२) शेती आधुनिक पद्धतीनेच केली पाहिजे. शेतीला नळाद्वारे (ठिबक सिंचनाचे बीजरूप) पाणी पुरवठा केला पाहिजे. त्यासाठी धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत.
३) शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक ऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. ‘शेतक ऱ्याचा असूड’ या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात. शेतकरी सुखी व्हायचा असेल धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत. शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक ऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. ‘शेतक ऱ्याचा असूड’ या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात. या घरातून त्यांनी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील लक्षणीय कामगिरी केली. शेती परवडत नाही म्हणून आजवर देशातील लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केलेल्या आहेत. १३० वर्षांपुर्वी त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही असे "शेतकर्‍याचा असूड" मध्ये सांगून या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले होते. आधुनिक पद्धतीची शेती करणे, तलावतळी,धरणे बांधून शेतीला "नळाद्वारे" पाण्याचा पुरवठा करणे, शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता. अशाप्रकारे आजच्या ठिबक सिंचनचे बीजरूपच जणू ते दाखवित होते.
 त्यांच्या शाळांमध्ये मुलामुलींना वयाच्या ६व्या वर्षापासून शेती आणि उद्योगाचे शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले होते.त्यांनीच पहिल्यांदा त्रिभाषा सुत्र सुचवले. शैक्षणिक गळतीच्या प्रश्नाचे मूळ शोधून त्यावर गरिब मुलांना विद्यावेतन {पगार} देण्याचा उपाय त्यांनी अमलात आणलेला होता.त्यांनी दाखवलेल्या याबाबतच्या इतर १५ कारणांचा आणि उपायांचा  अभ्यास आजही मार्गदर्शक ठरावा.

जोतीरावांनी लिंगभाव, जात आणि वर्ग या पक्षपाताच्या/शोषणाच्या तिन्ही केंद्रावर मारा करणारे क्रांतिकारी लेखन केले. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळी उभारल्या.

जोतीरावांची सामाजिक न्यायाची पंचसुत्रे आजही मार्गदर्शक आहेत. १.जातीनिर्मुलनासाठी आंतरजातीय  विवाह, २.सर्वांना ज्ञानसत्तेची कवाडे खुली करणे, ३. स्त्री-पुरूष समता, ४. संसाधनांचे [जमीन,पाणी, हवा, उर्जा, जंगल ] फेरवाटप करणे, ५. धर्मचिकित्सा.

१८६९ साली त्यांनी सर्वप्रथम मागासांसाठी जातनिहाय आरक्षण मागितले. सत्यशोधक पद्धतीच्या विवाहामध्ये हुंडा, मानपान, डामडौल यांना फाटा देऊन वाचवलेले पैसे शिक्षण संस्थाना दान देण्याची पद्धत पाडली. मंगलाष्टकामध्ये नवरी मुलगी स्वातंत्र्य,समता आणि न्यायाची मागणी करते तेव्हा नवरा मुलगा तिला सर्वांसमोर वचन देतो की, " स्थापाया अधिकार या बायकांचे झटतसे मी सदा, अर्पाया न भी मी सर्वस्व माझे कदा."
बायकांचे मानवी अधिकार या विषयावर आपल्याकडे मौलिक चर्चा आणि कृती झालेली असली तरी जोतीराव - सावित्रीबाईंनी या क्षेत्रात केलेले कार्य आजही पथदर्शक ठरणारे आहे.

शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिले जाते. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली जोतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत. रायगडावर जाऊन तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत चाफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८० साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत.
१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरे जावे लागले. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन टिळक आगरकरांच्या जामिनासाठी मुंबईला पाठविले. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र ‘केसरी’मध्ये छापून आले. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुराभिलेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणे, तिचे सुशोभिकरण करणे आणि शिवजयंती उत्सव सुरू करणे, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.

डा. जी.एस.घुर्ये आणि एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचे विशेषत: जातीव्यवस्थेचे ज्या पद्धतीने शास्त्रीय विश्लेषण केले होते ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात. त्यांचे हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे.
आपल्याकडे विचारवंत आणि सक्रीय कार्यकर्ते अशी विभागणी झालेली आहे.जोतीराव सक्रीय कार्यकर्ते होतेच पण ते विद्वानही होते. त्यांनी लोकशाही विचारांचा पाया घातला. आज अनेक जपानी, फ्रेंच आणि जर्मन विचारवंत जोतीरावांचा अभ्यास करीत आहेत. देशातील ६ हजार जातींच्या अस्मिता कुरवाळत न बसता त्यांच्या काचातून समाज बाहेर यावा यासाठी त्यांनी सत्यशोधक चळवळ केली. आज देश संकटातून जात असताना आणि १५-२० वर्षांनी आपला देश कुठे असेल याचा विचार करताना थरकाप उडतो. माओ आणि महात्मा गांधी यांच्या विचारातील अनेक मौलिक सुत्रे आपल्याला शतकभर आधीच जोतीराव देऊन गेले होते.

पुण्यातील त्यावेळच्या जुन्या गंज पेठेतील फुलेवाडा सुमारे ५० वर्षे सामाजिक चळवळींना रसद पुरवित होता. पूर्व पुण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण संमिश्र आणि विविधतेने नटलेले आहे. १८४८मध्ये त्यांनी देशातील मुलींची पहिली भारतीय शाळा सहकाऱ्यांच्या मदतीने भिडे वाड्यात सुरू केली, तेव्हा सावित्रीबाई  घराचा उंबरठा ओलांडून सार्वजनिक जीवनात पहिले पाऊल टाकत्या झाल्या. भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक जीवन अशा रीतीने सुरू झाले. भारतातील प्रौढ साक्षरता अभियान १८५४ मध्ये याच वाड्यात सुरू झाले. रात्रीच्या स्त्री-पुरुषांच्या दोन पहिल्या शाळा याच वाड्यात सुरू झाल्या. विधवांच्या बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि देशातील पहिला भारतीय माणसांनी चालवलेला अनाथाश्रम (बालहत्या प्रतिबंधक गृह) येथेच सुरू झाला. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला पाण्याचा हक्क देणारा पहिला हौद याच वाड्यात आहे. १८७३ साली याच घरात स्थापन करण्यात आलेला सत्यशोधक समाज देशातील सर्वदूर ग्रामीण भारतात पसरलेले पहिले जनआंदोलन ठरले. येथेच जोतिरावांनी १८५५ मध्ये मराठीतील पहिले आधुनिक नाटक 'तृतीय रत्न' लिहिले. १८६९ साली शिवरायांचा पोवाडामय चरित्रपट येथेच निर्माण झाला. 'शेतकऱ्यांचा असूड' आणि ’सार्वजनिक सत्यधर्माच” क्रांतिकारक तत्त्वज्ञान येथेच साकारले.

जोतिराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केले. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणे, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामे केली. जोतीरावांच्या  उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलाने जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केले. ‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थाने प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्याने तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत,भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेले आहे. जोतीरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामे त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली. जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचेही काम केले जाई.  बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केले. या कंपनीचे पुस्तकविक्री केंद्र होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे. अशी कितीतरी कामे या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.

जोतीरावांनी शेयर मार्केटवर अनेक कविता लिहिलेल्या आहेत. त्यातून या धंद्यात काय खबरदारी घ्यावी लागते, हा धंदा करताना कोणकोणती कौशल्ये असायला हवीत अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन केलेले आहे. पुणे शहराचे शासननियुक्त आयुक्त म्हणून त्यांनी १८७६ ते १८८३ अशी सात वर्षे काम केले. शहराला बंद नळाद्वारे पाणी मिळावे, रस्ते, बागा, ग्रंथालये, शाळा, दवाखाने उभारले जावेत यासाठी ते झटले. शहराचे आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण यावर त्यांनी भर दिल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. गव्हर्नर जनरलच्या पुणे भेटीच्या काळात रोषनाई व हारतुरे यावर अवास्तव खर्च न करता तो पैसा शाळा उभारण्यासाठी खर्च करावा असा बाणेदारपणा त्यांनी दाखवलेला होता. दारू विक्रीचे परवाने द्यायला त्यांचा विरोध होता.ते लिहितात,  "थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा. तोच पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचताना मनी शोध करा. देऊ नका थारा वैरभावा." दीडशे वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.

उद्योगामध्ये सचोटी आणि साधनसुचिता फार महत्त्वाची असते, असा विचार ते आपल्या कवितेतून मांडतात.
‘सत्य उद्योगाने रोग लया जाती, प्रकृती होती बळकट!
उल्हसित मन झटे उद्योगास, भोगी संपत्तीस सर्व काळ!
सदाचार सौख्य त्यांची सेवा करी, शांतता ती बरी आवडीने!
नित्य यश देई त्यांच्या उद्योगास, सुख सर्वत्रांस जोती म्हणे!
सर्व दुर्गुणांचा आळस हा पिता, बाळपणी कित्ता मुलीमुला!
तरूणपणात दुर्गुणी संसारी, वृद्धपणी करी हाय हाय!
उद्योगा सोडून कलाल बनती, शिव्याशाप देती जणामाजी!
आळशास सुख कधीच होईना, शांतता पावेना जोती म्हणे!
आळशांचा धंदा उद्योग करीती, दुकान मांडीती सोरटीचे!
नावनिशी नाही पैसा देई त्यांची, आदा आढाव्याची देत नाही!
उचल्याचे परी मूढास नाडीती, तमाशा दावीती उद्योगास!
अशा आळशाची शेवटी फजिती, धूळमाती खाती जोती म्हणे!

कोणत्याही प्रकारची हातचलाखी आणि अनीती ही माणसाला शेवटी धुळीला मिळवत असते. जुगार, मटका, लॉटरी या विनाकष्टांच्या गोष्टींचा ते निषेध करतात. हे सारे खिसा कापण्याचे उद्योग आहेत, असे फुले म्हणतात.
रोजगारासाठी पैसा नये गाठी ! अज्ञान्यास गाठी नफा हल!
शेअर घेणाऱ्यास गळा भाल दोरी! पावतीत सारी जडीबुटी!
पैसे बुडाल्यास नाही त्यास दाद! सुका आशीर्वाद भटासाठी!
उचल्याच्या परी खिसे कातरिती ! तोंड लपविती जोती म्हणे!
‘महापराक्रमी’ हर्षद मेहता याने बँकेच्या पावत्यांमध्ये गडबड करून फार मोठा आर्थिक घोटाळा केला होता. पावती हीच खरी जडीबुटी म्हणजे जतन करण्याची, लक्ष ठेवण्याची जागा आहे याचा इशारा जोतीरावांनी १२५ वर्षांपूर्वी दिला होता.
शेअर धंदा करताना जोतीराव काही पथ्ये सांगतात :
शेअर्स काढून उद्योग करणे! हिशोब ठेवणे रोजकीर्द!
खतावणी सर्व बिनचूक ठेवी ! नफा तोटा दावी शोधी त्यांस!
जामीन देऊन नितीने वर्तावे ! सर्वा वाचवावे अब्रूमध्ये!
शेअर्स विकू गेल्या काही नफा व्हावा! जगा दाखवावा जोती म्हणे!

लबाडी आणि फसवणूक यांचा निषेध करताना असले उद्योग जळोत असा थेट हल्ला ते करतात.
शेअर्स मार्केटात खप कागदाचा, नफा दलालाचा बूड धन्य!
शेअर्स कागदास पाहून रडती ! शिव्याशाप देती योजी त्यास!
शेअर्स व्यापाराचा जळो तो उद्योग ! होऊन नि:संग मूढा लुटी!
आळशाचा खरा नित्य हाच धंदा! दुरूनच वंदा जोती म्हणे!
लुटीचा कोणताही धंदा जोतीरावांच्या सत्शील वृत्तीला मानवणे शक्यच नव्हते.
त्यांचा भर सातत्याने प्रामाणिकपणे उद्योग, व्यापार आणि शेती करण्यावर असायचा, त्याचेच मोल त्यांनी आपल्या कवितेतून आणि कृतीतून उलगडवून दाखविले.
उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील जोतीरावांची ही लक्षणीय कामगिरी बघितली की त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानही अधिक उजळून निघते.

फुले हे लेखक, कवी, आद्य नाटककार तर होतेच पण ते मोठे प्रकाशकही होते. तुकाराम तात्या पडवळ यांच्या ’जातीभेद विवेकसार ’ ह्या ग्रंथासह कितीतरी महत्वाचे त्यांनी प्रकाशित केले होते. त्यांची पुण्यात पुस्तकविक्री, फळे, भाजीपाला, सोन्याचे दागिने बनवण्यासाठीच्या मुशी आदींची दुकाने होती.

भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतीरावांचेच प्रोत्साहन होते.टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यातही तेच दोघे पुढे होते.१८६९ साली जोतीरावांनी शिवचरित्र लिहिले. १८८५ साली  त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडवरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणुन लोकमाणसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत.

१८७६ ते १८८३ याकाळात ते पुण्याचे आयुक्त {कमिशनर} होते. घरोघरी बंद नळाद्वारे पाणी पुरविण्याची योजना यशस्वी करण्यासाठी ते झटले.उत्तम रस्ते, शाळा, आरोग्य, शहर स्वच्छता यावर त्यांचा भर होता.गव्हर्नरच्या स्वागतावर अनाठायी पैसा उधळण्याला तसेच मंडईच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला.त्याच पैशाचा वापर शिक्षणासाठी करावा असा त्यांचा आग्रह होता.आज शहरातील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रुप धारण केलेले आहे. या पार्श्वभुमीवर कमिशनर फुले यांनी आपल्या घरातील अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठीसुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला बघून चकित व्हायला होते.

महात्मा जोतीराव फुले हे पर्यायी संस्कृतीचे जनक होते. बहुजन समाजाच्या मानसिकतेचं समग्र परिवर्तन करण्यासाठी त्यांनी विचार मांडले, चळवळी चालवल्या. बहुतांश भारतीय समाज हा देव, धर्म, ईश्‍वर, परमेश्‍वर यावर अपार श्रद्धा असलेला आहे. तो पोकळीत जगू शकत नाही. अशा समाजाला विज्ञाननिष्ठा, साधनशुचिता आणि विवेकाच्या आधारावर उभी केलेली बुद्धिनिष्ठ श्रद्धा देण्याची त्यांची धडपड होती. 33 कोटी देवांवर विसंबून असलेल्या समाजाला परंपरा आणि परिवर्तन यांचा सुवर्णमध्य साधून एक नवा विचार त्यांनी दिला. त्यांनी पारंपरिक देव, ईश्‍वर, परमेश्‍वर, संकल्पना नाकारुन ’निर्मिका' ची संकल्पना विकसित केली. सत्यशोधकाला 33 नियमांची आचारसंहिता घालून देताना ही निर्मिक संकल्पना त्यांनी पायाभूत मानली आहे. लिंगभाव, वर्ग आणि जातीची विषमता संपूर्णपणे नाकारणारी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित ही संकल्पना ते देऊन जातात.

"अज्ञानाशी ज्ञान, पांगळ्या अन्नदान, हेच बा स्मरण निर्मिकाचे !!'' ही आपली निर्मिकपूजेची, आराधनेची संकल्पना ते सांगतात. बुद्ध कबीर येशू, महंमद पैगंबर, संत तुकाराम, टॉमस पेन, मिशनरी वृत्ती आणि अमेरिकन उदारमतवाद यांच्या प्रभावातून त्यांची ही संकल्पना विकसित होताना दिसते. सत्यधर्माची, शोषणविरहित आणि सर्वचिकित्सक मानसिकता वाढीला पूरक ठरणारी ही मांडणी काळाच्या ओघात ओढाताण झाल्यानं बाजूला पडली असली तरी भारतीय समाजमनाला ती एक उत्तम पर्याय देते, ही निश्‍चित.

फुले साहित्याचा आपण गेल्या २५ वर्षात हिंदी, तेलगू, बंगाली, कन्नड, तमीळ, उर्दू, पंजाबी, इंग्रजी आदी १३  भाषांमध्ये अनुवाद केलेला आहे. त्याला विविध राज्यांमध्ये खूप मोठी मागणी आणि लोकप्रियता मिळते आहे त्याचे कारण या साहित्याची प्रस्तुतता होय.

सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली.आजचे सामाजिक न्यायाचे सगळे राजकारण याच सुत्राच्या भोवती फिरते आहे.जोतीरावांच्या  राजकारण समजून घेण्यासाठी "सत्तेवाचून सकळ कळा झाल्या अवकळा" हे जोतीसुत्र समजून घेतले पाहिजे. त्यांचा विरोध शोषणकर्त्या नेतॄत्वाला होता. त्यावेळी हे नेतॄत्व ब्राह्मणांकडे होते.हा समाज त्यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक सत्तेच्या सगळ्या किल्ल्या स्वत:च्या कंबरेला बाळगून होता. जोतीराव पर्यायी संस्कृतीचे जनक होते.

आज समग्र सत्ता परिवर्तन झालेले आहे.आता सगळी सुत्रे बहुजनांकडे आलेली आहेत. आज जोतीराव असते तर त्यांनी आसुडाचे  फटके कोणाला मारले असते? "ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधूपरी!" असे पोटतिडकीने सांगणार्‍या जोतीरावांच्या नावाचा वापर जातीविद्वेष पसरवण्यासाठी केला जावा ही शोकांतिका आहे. सत्ता समग्र बहुजनांपर्यंत झिरपलेली नाही. भटकेविमुक्त, दलित-आदिवासी,ओबीसी,महिला यांची परवड चलू आहे.

देशातील सत्ताधारी वर्गाचे अपयश लपवण्यासाठी आणि वर्ग, जाती, धर्म व लिंगभावाच्या आधारे केले जाणारे शोषण आणि पक्षपात यांच्यावर पांघरूण घालण्यासाठी आज जातीविद्वेषाच्या वणव्याचा सर्रास आधार घेतला जातो आहे. अशावेळी जोतीरावांचा विवेकी वारसा समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या कालसुसंगत संकल्पचित्राच्या प्रकाशात सामाजिक ऎक्याची चळवळ मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला जायला हवा..

Sunday, November 1, 2015

उद्योगपतीच, पण …

मार्क झकरबर्ग, अ‍ॅपलचा स्टीव जॉब्स, अ‍ॅमेझॉनवाला जेफ बेझोस . अशी अनेक नावं यात घेता येतील.
जे आतापर्यंत कधीच नव्हतं ते या मंडळींनी करून दाखवलं.
जे केलं ते अफाट आहे. आणि तरीही ही मंडळी म्हणतात जे काही झालं ते श्रेय एकटय़ा दुकटय़ाचं नाही.
काल-परवा मार्क झकरबर्ग आपल्याकडे येऊन गेला. फेसबुक काढण्याची कल्पना त्याची. त्यामुळे अर्थातच तो तरुणांच्या गळ्यातला ताईत वगरे. त्याला विचारले गेलेले प्रश्नही त्याच संदर्भातले. त्यावर बोलताना तो म्हणाला.. फेसबुकचं श्रेय हे माझं एकटय़ाचं नाही.. फेसबुक, अ‍ॅपलसारखं जेव्हा काही घडतं तेव्हा ते एकटय़ा-दुकटय़ाचं नसतं.
त्याच दिवशी अ‍ॅपलच्या विक्रमी फायद्याची बातमी आली. न भूतो न भविष्यती इतका रग्गड नफा या कंपनीनं कमावलाय. त्या कंपनीच्या कामाचा आणि त्यामुळे आकाराचा आवाका किती आहे, ते एकदा समजून घ्यायलाच हवं.
तर अ‍ॅपलचा वट्ट नफा आहे तब्बल ५३०० कोटी डॉलर इतका. याचा अर्थ ही कंपनी एका आठवडय़ाला १०० कोटी डॉलर..म्हणजे साधारण ६५०० कोटी रुपये.. इतका नफा गेले वर्षभर कमवतीये. तरीही त्याही वर अ‍ॅपलनं १०० कोटी डॉलर कमावलेत. याचाच दुसरा.. आणि तितकाच खरा.. अर्थ असा की एका सेकंदाला १६९३.११ डॉलर इतकी कंपनीची कमाई आहे. म्हणजे हा लेख वाचायला समजा एखाद्याला १० मिनिटं लागली तर तेवढय़ा वेळात १०,१५,८६६ इतके डॉलर त्या कंपनीच्या खिशात गेले असतील.
या अवाढव्य आकाराचा अर्थ काय?
या कंपनीची मार्केट कॅप ७५,००० कोटी डॉलरपेक्षाही अधिक आहे. तर जगात केवळ २३ इतकेच देश असे आहेत की, ज्यांची अर्थव्यवस्था अ‍ॅपलच्या आकाराशी स्पर्धा करू शकेल. म्हणजे उर्वरित १७३ देशांची अर्थव्यवस्था अ‍ॅपलपेक्षा लहान आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा तब्बल २० टक्के वाटा एकटय़ा अ‍ॅपलकडून येऊ शकेल. भारतातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज. अ‍ॅपल ही रिलायन्सपेक्षा आकाराने २७ पट मोठी आहे. अ‍ॅपलचा एका तिमाहीतला फायदा १८०० कोटी डॉलर. भारतातल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधल्या पहिल्या ५० कंपन्या घेतल्या तर या कंपन्यांच्या एकत्रित वार्षकि नफ्यापेक्षाही अधिक अ‍ॅपलचा फक्त तिमाही नफा आहे. आपल्याकडच्या सगळ्यात मोठय़ा कंपन्यांचा नफा जेमतेम १०० कोटी डॉलर इतकाच आहे. म्हणजे आपल्या मोठय़ा कंपन्यांच्या वार्षकि नफ्याच्या किती तरी पट अ‍ॅपलचा फक्त तिमाही नफा आहे. अर्थातच अ‍ॅपलच्या या इतक्या प्रचंड नफ्यामुळे कंपनीच्या हाती केवळ रोकड पडून आहे. ती आहे २०,००० कोटी डॉलर इतकी प्रचंड. म्हणजे ही रक्कम म्हणजे आजचा गल्ला आहे. ही रक्कम खर्च करून अ‍ॅपलनं समजा कंपन्याच विकत घ्यायचं ठरवलं तर या रकमेतून अख्खी आयबीएम, अख्खी इन्टेल आणि अख्खी आपली टीसीएस या कंपन्या अ‍ॅपलला विकत घेता येतील आणि तरीही वर काही चिल्लर शिल्लक राहील.
या फायद्यातला सगळ्यात मोठा वाटा येतोय तो अर्थातच आयफोन्समधून. हे फोन्स हे अ‍ॅपलचं इंजिन आहेत. अ‍ॅपलनं एका तिमाहीत फक्त विकल्या गेलेल्या आयफोन्सची संख्या आहे ४ कोटी ८० लाख इतकी. गेल्या वर्षी याच तिमाहीत अ‍ॅपलला ३ कोटी ९० लाख इतके आयफोन्स विकता आले होते. म्हणजे या कंपनीच्या एका तिमाहीपुरत्या विकल्या जाणाऱ्या फोन्समध्ये तब्बल एक कोटींनी वाढ झालेली आहे. या कंपनीच्या टीकाकारांच्या मते नव्यानं बाजारात आणलेलं आयवॉच तितकं काही चांगलं नाही, त्याला इतकी मागणी नाही. काही प्रमाणात ते खरं असेलही. पण तरीही केवळ आयवॉचच्या विक्रीतून कंपनीनं ३०० कोटी डॉलर कमावलेत. आता काय करायचं या आकाराचं?
खुद्द कंपनीलाही हा प्रश्न पडला असावा. कारण पुढच्या काळात आपली वाढ इतकी तेज नसेल असा इशारा कंपनीनंच दिलाय. चीनची मंदावलेली अर्थव्यवस्था हे त्याचं कारण आहे. तो दिल्यामुळे चीनबाबतही आपल्या जाणिवा जरा अधिक स्पष्ट होतील. आपल्या भारतीय अशा टाटा समूहाकडे मालकी असलेल्या जग्वार लॅण्ड रोव्हर.. म्हणजे जेएलआर.. या कंपनीसाठी आगामी काळ आव्हानाचा आहे. कारण चीन मंदावतोय म्हणून. या कंपनीची सगळ्यात मोठी बाजारपेठ चीन आहे. तेव्हा त्याची गती मंदावली तर तीवर आधारित सगळ्यांनाच फरक पडणार. म्हणजे अ‍ॅपल ते आपली जेएलआर इतक्या मोठय़ा पसाऱ्यातल्या कंपन्यांना फरक पडणार तो फक्त चीनमुळे. असो. अर्थात तरीही नवनव्या उत्पादनांमुळे हे नुकसान अन्यत्र भरून काढलं जाईल, असा अ‍ॅपलला विश्वास आहे.
अ‍ॅपलच्या या भव्यदिव्य यशामुळं जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक बाब घडली. ती म्हणजे पेट्रोलियम कंपनीवर पहिल्यांदाच एखाद्या अशा आधुनिक उत्पादनाच्या निर्मात्यानं मात केली. इतके दिवस.. म्हणजे गेल्या वर्षअखेरीपर्यंत एक्झॉन मोबिल ही जगातली क्रमांक एकची कंपनी होती. ती कमवत असलेला नफा हा असा इतका अगडबंब होता. त्या कंपनीची ताकद इतकी होती की, सरकारं त्या कंपनीच्या तालावर नाचायची. ही कंपनी रॉक्फेलर या आद्य उद्योगसम्राटाच्या स्टॅण्डर्ड ऑइल या कंपनीच्या परिवारातली. सगळा परिवारच तो बडय़ा कंपन्यांचा. सगळ्याच्या सगळ्या एकजात मोठय़ा झाल्या. असो. मुद्दा तो नाही.
तर पहिल्यांदाच एखाद्या तंत्रज्ञान कंपनीनं तेल कंपनीला कसं मागे टाकलं हा आहे. या दोन अव्वल नंबरी कंपन्यांतला फरक म्हणजे तेल कंपनीच्या आगेमागे खूप राजकारण चिकटलं. आणि अजूनही चिकटतं. कारण तेल हा विषयच मुळी राजकारणाचा आहे. आणि फक्त तेलच नाही. तर जे जे खनिजाच्या रूपातनं निघतं.. मग ते तांबं असेल, पोलाद, बॉक्साइट किंवा तेलही असेल.. त्यांचं व्यावसायिकीकरण हे राजकीयच होतं. आपल्याकडचं बघा. आपण काही तेल वा पोलाद वा तांबं वा बॉक्साइट आदी खनिजांच्या उत्पादनात जागतिक कंपन्यांइतके मोठे नाही. तरीही आपल्याकडेही राजकीय वादात सापडतात त्या तेल आणि अन्य खनिज कंपन्याच. या आणि अशा कंपन्यांच्या नफ्याला त्यामुळे एका अर्थानं राजकीय दरुगधी असते. अशा बडय़ा तेल कंपनीला मागे टाकून अ‍ॅपलनं मुसंडी मारली त्यामागचा मोठेपणा आहे तो हा.
ही माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार क्षेत्रातली कंपनी. या क्षेत्रातली उत्पादनं एका अर्थानं निर्गुण, निराकार असतात. म्हणजे उत्पादनाआधी ती केवळ संकल्पना असतात. खनिजांचं तसं नाही. ती दिसतात, त्यांना स्पर्श करता येतो. त्यांच्याकडून काय होणार आहे, त्यांचा उपयोग काय, हे सगळं अगदी सामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्तीलाही कळू शकतं. पण संकल्पनांचं तसं नाही. या संकल्पना मूर्त स्वरूपात साकारल्या गेल्या तर नक्की काय होणार आहे हे फक्त द्रष्टय़ांनाच समजू शकतं.
मार्क झकरबर्ग, अ‍ॅमेझॉनवाला जेफ बेझोस, अ‍ॅपलचा स्टीव्ह जॉब्स हे खूप मोठे ठरतात ते यामुळे. अशी अनेक नावं यात घेता येतील. जे आतापर्यंत कधीच नव्हतं ते या मंडळींनी करून दाखवलं. जे केलं ते अफाट आहे. आणि तरीही ही मंडळी म्हणतात जे काही झालं ते श्रेय एकटय़ा-दुकटय़ाचं नाही. सर्वोच्च पदावर पोहोचूनही मार्क झकरबर्ग बारा महिने चौदा काळ साध्या करडय़ा रंगाचा टीशर्ट आणि जीनची पॅण्ट अशा वेशात असतो. परवा आपल्याकडे येऊन गेला तेव्हाही तो तसाच होता. स्टीव्ह जॉबही तसाच. काळा पुलओव्हर आणि जीनची पॅण्ट. स्टीव्हनंतर कंपनीची सूत्रं ज्याच्या हाती गेली तो टिम कुक हा देखील तसाच. काळा शर्ट आणि जीनची पाटलोण.
झकरबर्ग काय किंवा जॉब्स काय. त्यांनी जे काही केलं त्याचं अनुकरण केलं.. करता आलं तर फारच उत्तम. पण इतकं प्रचंड, गगनाला हात लागेल असं काम केल्यानंतरही त्यांचे प्रवर्तक, उद्गाते यांचे पाय जमिनीवर राहतात तरी कसे.. हे आपल्याला कळायला हवं. एरवी एखाद-दुसरा कशीबशी जेमतेम एक पिढी टिकणारा कुटीरोद्योग चालवून जन्मभरासाठी उद्योगपती असं बिरुद मिरवणारे आपण आसपास पाहत असतोच की.