Friday, June 17, 2016

कधी नव्हे ते आई घाई करत होती, पाणी लवकर जातं  बाबा लवकर निघतात आईलाही कामला बसायचं असतं त्याच्या आधी केरवारे पुजा पोथी उरकायची असते हे तसं दोघांच्या सवयीचं होतं  त्यासाठी मुलांच्या मागे लागायची गरज नव्हती पण तरी आई दोघाना आटपा भराभर आटपा भराभर करत होती
आई काय झालय शेवटी मुलानी विचारलच.. पोह्याची तयारी केली आहेस शेव सुद्धा आणलीस जाऊन
आई म्हणाली काही नाही रे पोरानो माझी एक बालपणीची मैत्रीण येणार आहे मला भेटायला काल तिने तिच्या ड्रायव्हरच्या  हाती निरोप धाडला होता
तिच्या समोर वेडेपणा करायचा नाही शाहण्यासारखं वागायचं
आपल्या बारा तेरा वर्षांच्या मुलाना ती आई सांगत होती आहे त्यात आपलं छोटसं घर आवरत होती ठेवणीतली चादर तिने पलंगावर अंथरली... जुनं एक जाजम होतं ते जमिनीवर पसरलं  रात्री पलंगावर बाबा झोपत असले तरी दिवसा पाहुणे आले तर त्यांची उठबस पलंगावरच व्हायची पालंगा खालची अडगळ दिसू दिली तर  साधे नेहमीचे पाहुणे आणि ती अडगळ लपवायचा प्रयत्न केला तर कोणीतरी खास पाहुणे हे आता मुलानाही माहीत झालं होतं , अत्ता सुद्धा आई ती अडगळ लपवायच्या मागे लागली होती कधी नाही ते तिने स्वैपाकघराच्या दारचा मधला पडदाही खाली सोडला होता पडदा सोडला की मुलाना पडद्याशी खेळायला ऊत यायचाअत्ता ही मुलं सरसावली तशी आईने घाईने अडवलं म्हणाली पाहुणे येऊन जाउदेत मग काय हवं ते खेळा
मुलं म्हणाली आई मैत्रीण म्हणतेस, मग ते पाहुणे कसे?
आई स्वत:शी हसली म्हणाली जो पर्यंत तिला प्रत्यक्ष  समोर  बघत नाही तो पर्यंत ते पाहुणेच.. भले माझी ती बालपणीची मैत्रीण असेल.. पण आज आम्ही वीस वर्षानी भेटणार आहोत
यावीस वर्षात खूप फरक पडलाय आम्हा दोघीत, स्वत:शी उजळणी करत ती उसंत घेत  बसली वैभव वैभव काय म्हणतात ते तिने सुद्धा अनुभवलं होतं
ऐस्पैस बंगला होता नोकर चाकर होते स्वैपाकाला दोन दोन स्वैपाकी होते, पण धाकट्या दिराने दगा दिला आणि दोन महिन्यात होत्याचं नव्हतं झालं परिस्तिथी खालावत खालवत गेली  पण ही म्हणायची माझा नवरा माझी मुलं हेच माझं खरं वैभव.. ते जो पर्यंत माझ्यापाशी आहे  तो पर्यंत मला काही कमी नाही
मशिबाने दोन्ही मुलं अभ्यासात  भलती हुशार होती अभ्यासू होती थोदा वांडपणा करायची पण त्यांच्या वयाचा विचार केला तर ते रास्तच होतं
यजमानांचा गमावलेला काँन्फिडंस  हिने  हिच्या पाठिंब्याने परत आणला होता
त्यांची नव्याने धडपड हिच्या जिवावर सुरू होती हिचा शिलाईवर फार अल्पकाळात जम बसला होता
दिवस रात्र पाठ आणि मान मोडून ती कामं पूर्ण करत होती त्यात उपास तापास व्रतं वैकल्य सुरूच होती... घरा  भोवतीची बाग हा तिचा विरंगुळा होता घरमालकालाही तिच्या या बागेचं कौतूक होतं  कोणी आलं तर तिच्या घरा भवतीच्या बागेची दखल घेतल्या शिवाय जात नसत
ती एक्दम भानावर आली ट्रंकेत ठेवलेल्या कप बशा काढायच्या होत्या त्या अशा निमित्तानेच ट्रंकेतून बाहेर  यायच्या.. फार  जपून वापरल्या जायच्या
आईनी बघितलं तर मुलानी आँलरेडी कप बशा जपून काढून ठेवल्या होत्या तिला मुलांचं भारी कौतूक वाटलं तिला मायेनं त्याना जवळ घ्यायचं होतंपण इतक्यात घराशी गाडी थांबल्याचा आवाज आला, ती बाहेर जाईपर्यंत शोभना तिची मैत्रीण आणि तिची मुलगी योहा गाडीतुन उतरतच होत्या ड्रायव्हरने फळांची करंडी काढली तिला आपले जुने दिवस आठवले दिवाळी दसर्‍याच्या निमित्ताने अशा डझनावरी करंड्या हिच्या घरून रवाना व्हायच्या... हिने आपल्या मुलाना कधी या श्रीमंतीच्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या फळांची टोकरी बघून मुलं हरखून गेली
शोभनाचं सुप्त समधान झालं ही म्हणाली अगं कशाला आणलस इतकं
शोभना म्हणाली इतक्या वर्षानी भेटतोय रिकाम्या हाताने कसं यायचं  हिने लगेच तिची गणना पाहुण्यात करून टाकलीमैत्रीण म्हणून भेटायला येती तर आल्या आल्या गळाभेटी भेटली असती फळाच्या करंडीने हात भरले नसते
.. पाहुण्यात गणना झाल्यावर तिच्याकडून काही अपेक्षाच राहिल्या नाहीत त्यामुळे त्या दोघीनी बागेकडॆ बघितलं सुद्धा नाही याचं तिला नवल वाटलं नाही एकूण शोभनाचा तोरा बघून मुलानी तिला आँटीची उपाधी देऊन टाकली आणि हिने सुद्धा मावशी म्हणायला सांगितलं नाही  जुजबी चौकशी करताना हिच्या दोन्ही मुलाना स्काँलरशीप मिळाल्याचं कळल्यावर  शोभनाच्या चेहयावर उसना आनंद जाणवला तिची मुलगी सुद्धा कस्ला तरी महागडा कोर्स करत होती योहा या मुलांपेक्षा मोठी होती पण जरा जास्त मोकळी होती
शोभना ने हिचं गत वैभव आठवून गळा काढायचा प्रयत्न केला पण हिने तो शिताफीने थोपवला.. गप्पा रंगायचा प्रश्नच नव्हता पण संवादही प्रयत्नपुर्वक सुरू ठेवावा लागत होता शोभनाच्या श्रीमंतीचे किस्से ऐकताना मुलं जरा रंगून जात होती ती पण जरुरीपुरतं  होला हो करत होती
पण तरी झालं काय जुन्या वाडीतलं घर, चोवीस तास घर  व्हरांडा उघडा इतकं भल्या मोठया गाडीतून कोण आलय याची उत्सुकता शेजार्याना होतीच कारण नागवेकर सोडले तर गाडीवाले पाहुणे  या घराला माहीत नव्हते... मग या ना त्या बहाण्याने बायकांची ये जा सुरू झाली... तशीही या घरी कोणती गोष्ट मागितली आणि मिळाली नाही असं कधीच होत नाही अशी ख्याती होती या घराची बायका हक्कानं मागायला यायच्या अणि हे सढळ हाताने द्यायची
अत्ता सुधा शोभना समोर  जठार बाई आली नंदूची आईss जरा दुध मिळेल का हो दोनदा तापवलं तरी दुध नासलच हिने आढे वेढे नं घेता तिने आणलेल्या  भांड्यात दुध दिलं मग कोणी विरजण मागायला तर कोणी पिंपातलं एक बादली पाणी मागायला कोणी इस्त्री मागायला तर कोणी शिलाईचे कपडॆ न्यायला येतच राहिलं शोभनाला कळून चुकलं हिची खुपच सामान्य परिस्थिथी झालिये... जाताना मुलांच्या हातात हजार रुपये ठेवायचे तिने ठरवून टाकलं त्या  मानाने योहा खूप मोकळी झाली होती तिला हे माणसांचं येणं जाणं खूप आवडलं होतं ती म्हणाली मम्मा आपल्याकडॆ कोणीच असं येत नाही पार्टीला लोक जमतात पण असे येत नाहीत शोभना आपल्या मुलीच्या बोलण्याने सुखवलीच
हिने पोहे करायला घेतले आणि त्याच्या  घमघमाटाने तर वातावरणच बदलून गेलं
अमेझींग अमेझींग करत योहा वेडीच झाली आँटी काय करतेस काय करतेस करत ती स्वैपाकघरात शिरली तिच्यामुळे शोभनालाही तिच्या इवल्याशा स्वैपाकघरात शिरता आलं
तिचं स्वैपाकघर ते कसलं त्यातच छोट्टीशी मोरी एक कपाट देव्हारा देव्हार्यातले देव बघून योहा नकळत म्हणून गेली हाऊ प्रिटी आणि इतकी सगळी फ्लावर्स कुठून आणली.. तिला हासायलाच आलं म्हणाली बाहेर बघ ना बाग कशी फुलली आहे
बाग बघायला योहा बाहेर गेली आणि शोभनाला जाणवलं आपण समजत होतो तशी ही बिच्चारी दिसत नाहिये... तिला असुयाच वाटली ऐशोआरामात राहुनसुद्धा आपण मनात दडलेली असुरक्षितता काढून टाकू शकलो नाही
आणि ही बघा कुठल्या कुठे भिरकावली गेली पण नव‍र्याचा हात घट्ट धरून ती उभी आहे इतकच  नाही तर नवर्‍यालाही  तिने ठाम केलय.. ही पोह्याची डीशेश भरत असताना तिघं  चौघं आले कोणी वहिनी म्हणतय कोणी ताई कोणी माव्शी म्हणतय आणि हक्काने पोह्यांची मागणी करतय.. आणि ही सुद्धा आनंदाने सागळ्याना बोलावतेय सगळ्यांच्या बशा भरतेय तिला अचानक आपल्या मिसेस वाडेकर या हाकेचा आणि ओळखिचा उब्ग आला
ती भराभर बशा भरत होती नं राहवून ही म्हणाली अगं इअतके पोहे आहेत का?
नाहीतर  माझ्यातले  कमी कर
ती म्हणाली नाही गं आपल्याकडे जे करायचं ते भरपूरच करावं लागतं  मला तीच सवय झालिये.. पोहे न्यायला ही झुंबड उडाली तिच्या बद्दल वाटणारं अगत्य आणि प्रेम प्रत्येकाच्या वागण्यात दिसत होतं शोभनाला आपल्या आयुष्यातला फोलपणा जाणवला तिचं मन तुलना करायला लागलं आणि तिला तिथे बसवेना
पण योहा पूर्ण रमली होती आई  मी माव्शीकडे राहयला येणार आहे तिने ऐलान करून टाकलं ही नं राहवून म्हणाली काय वेडी आहेस का? टाँयेलेट्स बाहेर आहेत यांची.. असुदेत तिथे काय मी दिवसभर बसणार  नाहिये... सगळे हसले नकळत शोभनालाही हसयला आलं तिला आपण धरून ठेवलेल्या रुबाबाचं ओझं जाणवलं  नवर्‍याच्या नावावर मिळवलेला रुबाब.. आणि इतक्यात मिसेस नागवेकर आल्या
मावशी मावशी म्हणत तिची मुलं त्याना बिलगली त्यानीपण मायेनं त्या दोघाना जवळ घेतलं  नागवेकराना बघून शोभना थोडी अवघडली
आणि त्यांचं लक्ष गेलं अरे तुम्ही इथे कशा? मिसेस नागवेकरानी विचारलं
ही म्हणाली तुम्ही ओळखता एकमेकीना?
शोभना वरमल्या स्वरात म्हणाली अगं या बाँस आहेत माझ्या मिस्टरांच्या
पण तुम्ही इथे कशा? शोभना अवघडत म्हणाली
मी नेहमीच येते पण तुम्ही इथे कशा?
ही म्हणाली आम्ही शाळेत दोघी पहिलीपासनं एका वर्गात होतो
अशी काय ओळख करून देतेस? तिला जवळ घेत शोभना  म्हणाली ही माझी बालपणीची मैत्रीण आहे जरा हिच्याकडून हिम्मत  घ्यायला आले होते
अचानक शोभना मोकळीच झाली म्हणजे अगदी हिच्या शिगडीशी उभं राहून चहाच आधण ठेवण्यापर्यंत
निघताना  ती मुलांच्या हातात हजार रुपये ठेवणार होती पण उलट ती मुलाना जवळ घेऊन म्हणाली मला मावशी म्हणायचं आणि तुम्हाला सुट्टी लागली की माझ्याकडे राहयला यायचं ही वेडी ताई आहे ना तिलाही मी पाठवेन तुमच्याकडे निरोप घेताना तिला खरच खूप जड झालं   नक्की ये नक्की  ये करत ती निघाली
निघताना आवर्जून बागेत शिरली नागवेकर मुलांबरोबर पोहे खात गप्पा मारण्यात रमलेल्या ही या दोघींच्या पाठी होती याची त्याना कल्पना नव्हती
योहा म्हणत होती काय  मम्मा रबीश, तू म्हणत होतीस चल तुला पुअर माणसाच घर दाखवते
मावशीचं घर स्माँल आहे पण ती पुअर कुठय?

No comments: