स्थापनेपासूनच शिवसेना हा उडाणटप्पू तरूणांचा जमाव किंवा झुंड अशी टिका होत आली आहे. सहाजिकच कालपरवा पाकविषयक भूमिकेतून सेनेने ज्या गोष्टी केल्या, त्यावरून उठलेल्या प्रतिक्रीयांमध्ये नवे असे काहीच नाही. हुल्लड वा घुडगुस हे शब्द शिवसेना पहिल्या दिवसापासून स्विकारत आलेली आहे. त्याखेरीज सेनेवर बंदी घालण्याचेही प्रस्ताव नवे नाहीत. सवाल इतकाच आहे, की अशा विषयावर आपले पावित्र्य मांडायला जे लोक धावतात, त्यांनी निदान आपल्या वागण्यातून सोवळेपणा दाखवायला हवा ना? मगच त्यांच्या वक्तव्याला वजन येऊ शकेल. शिवसेनेच्या गुंडगिरी विरोधात आजवर ज्यांनी आवाज उठवला आहे, त्यांनीही संधी मिळाली व शक्य असेल तिथे तितकीच हिंसा वा गुंडगिरी करून दाखवली आहे. त्यात आता आम आदमी पक्षाची नव्याने भर पडली आहे. लोकसभा निवडणूकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली, तेव्हा ‘आप’प्रमुख अरविंद केजरीवाल गुजरातचा दौरा करीत होते. तात्काळ आचारसंहिता लागू झाल्याने त्यांच्या गाड्यांचा ताफ़ा तिथल्या पोलिसांनी रोखला आणि कारवाई केली. त्यानंतरचा घटनाक्रम कोणाला आठवतो काय? तासाभरात दिल्लीतल्या भाजपा कार्यालयाच्या दारात एक टोपीधारी झुंड येऊन उभी ठाकली आणि मोदी व भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. आधी नुसत्या घोषणा देणारा हा जमाव, अल्पावधीतच इतका हिंसक झाला, की मिळतील ते दगडधोंडे विटांचा मारा भाजपाच्या कार्यालयावर होऊ लागला. तिथे गेटच्या भितीवर चढून त्याचे नेतृत्व आशुतोष नावाचा माजी पत्रकार करीत होता. अगदी कुंड्याही फ़ेकल्या गेल्या. अशा पक्षाने शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी करावी, याला विनोद म्हणायचे की दुसरे काय? आपल्या नेत्याला गुजरातमध्ये रोखले गेल्यावर दिल्लीत दंगल माजवणार्यांनी, शिवसेनेला दंगलखोर ठरवून बंदीची मागणी करावी का?
एकूणच देशातील राजकारण, बुद्धीवाद वा सामाजिक क्षेत्रात किती छछोरवृत्ती बोकाळली आहे, त्याची प्रचिती सध्या येत आहे. शिवसेना निदान पावित्र्याचा आव आणत नाही. पण प्रत्येकवेळी राजघाटावर जाऊन गांधी समाधीसमोर मौनाचे नाटक रंगवणारे इतक्या थराला जातात, तेव्हा लोकांना गुंडगिरी आवडली तर नवल नाही. गांधीं वा अन्य कुणा महात्म्याच्या नावाने गळा काढायचा आणि गुंडगिरीही करायची, यापेक्षा सरळ गुंडगिरीचा पवित्रा निदान अधिक प्रामाणिक असतो. या निमीत्ताने थोडा जुना राजकीय इतिहासही सांगण्याची मग गरज वाटते. शिवसेना आरंभापासून अशीच आहे. पण तिच्या गुंडगिरीला राजकीय मान्यता व सन्मान देण्याचे पहिले पाप कोणी केले? त्या काळात कम्युनिस्टांकडून सतत मार खाणार्या प्रजा समाजवादी पक्षाला लाल बावट्याशी दोन हात करणारे ‘गुंड’ हवे होते आणि नव्याने आकार घेत असलेल्या शिवसेनेत तशाच तरुणांचा भरणा होता. म्हणूनच प्रा. मधू दंडवते यांनी सेनेला हाताशी धरले. १९६८ ही शिवसेनेने लढवलेली पहिली पालिका निवडणूक! त्यामध्ये शिवसेनेला सोबत घेऊन युती करणारे होते मधू दंडवते! तेव्हाही सेनेवर वसंतसेना असा आरोप व्हायचा आणि आजही त्याची आठवण करून दिली जाते. पण समाजवादी लोकांनी सेनेशी हातमिळवणी करण्याचे महत्वाचे कारण कम्युनिस्टांची आक्रमकता हेच होते. कृष्णा देसाई वा तत्सम हुल्लडबाजी करणार्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी समाजवादी दोन हात करू शकत नव्हते. त्यासाठी शिवसेना उपयुक्त होती आणि म्हणून ती गुंड नव्हती. आज कम्युनिस्ट व समाजवाद्यांना एकत्रित पुरोगामी संबोधले जाते. पण पाच दशके मागे गेलात, तर कम्युनिस्ट सुद्धा गुंड असल्याचे दाखले समाजवाद्यांच्या तेव्हाच्या वक्तव्ये व विधानातून मिळू शकतील. याचा अर्थ इतकाच, की सोयीचे असेल तेव्हा गुंड लढवय्ये असतात आणि गैरसोय होऊ लागली मग नुसतेच गुंड असतात.
इतक्या जुन्या कालखंडात ज्यांना जायचे नसेल, त्यांनी अलिकडल्या म्हणजे ३० वर्षापुर्वीच्या राजकीय घडामोडी तपासून बघायला हरकत नाही. तेव्हा सोवियत दौरा करून आलेल्या ‘नवाकाळ’ संपादक निळूभाऊ खाडीलकरांनी ‘प्रॅक्टीकल सोशालिझम’ नावाची पुस्तिका लिहीली होती. त्यात मास्कोमध्ये कुणाही बाहेरच्या व्यक्तीला येऊन मोकाट वास्तव्य करता येत नाही, असा उल्लेख वाचून बाळासाहेब प्रभावित झाले. तेव्हा त्यांना कम्युनिस्ट करण्याची मोहिम हाती घेण्यात आलेली होती. कॉम्रेड डांग्यांचे जावई बानी देशपांडे व प्रकाशक कॉम्रेड वा. वि. भट मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुखांना दास कॅपिटलचे धडे देऊ लागले होते. त्यातूनच मग तेव्हाच्या दसरा मेळाव्यात श्रीपाद अमृत डांगे नावाचे ‘एक’ कम्युनिस्ट नेते सेनेच्या व्यासपीठावर येऊन दाखल झाले होते. १९८० च्या दशकातली गोष्ट आहे. तेव्हा कुणा डाव्यांना आपला वयोवद्ध कॉम्रेड गुंडगिरीच्या आहारी जात असल्याचे कसे सुचले नाही? मात्र इतक्या सहजगत्या कुणाच्याही आहारी जायला बाळासाहेब हा माणूस पुरोगामी विचारवंत नव्हता. म्हणूनच कम्युनिझम बाजुला पडला आणि काही महिन्यातच शिवसेनेने हिंदूत्वाचा ध्वज खांद्यावर घेतला. हा सगळा इतिहास आजच्या पुरोगामीत्व चघळणार्यांना ठाऊक नसावा किंवा गैरसोयीचा असल्याने त्याबद्दल बोलायची हिंमत नसावी. सवाल इतकाच आहे, की शिवसेनेविषयी कुठले तरी एक ठाम मत कोणी पुरोगामी दाखवू शकले आहेत काय? एकदा मधू दंडवते शिवसेनेच्या कुबड्या घेतात, तर कधी कॉम्रेड डांगे सेनेच्या व्यासपीठावर स्थानापन्न होतात. शिवसेना तीच आहे आणि तिच्यातली हुल्लडबाजी तशीच्या तशी कायम आहे. मग वेळोवेळी वैचारिक भूमिकांचे तोल कशाला जात असतात? विचार पक्का असेल, तर एकाच बाबतीत सदोदीत वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागायचे कारण नाही ना?
शिवसेनेकडे कुठलाच विचार नाही वा राजकीय भूमिका नाही, असे सातत्याने सांगितले गेले आहे. पण ज्यांच्यापाशी राजकीय भूमिका वा निश्चीत विचारसरणी आहे, त्यांना सातत्याने आपल्या भूमिका कशाला बदलाव्या लागतात? त्याचे उत्तर कोणी देणार नाही. कारण उत्तर असायला हवे ना? आम आदमी पक्षाच्या मुंबई व महाराष्ट्र शाखेचे पक्षाचे सर्वेसर्वा केजरीवाल यांनी महिनाभरापुर्वी विसर्जन केले आहे. ते खरे असेल, तर मग प्रिती मेनन नावाच्या त्याच पक्षाच्या मुंबईतील प्रवक्त्या पक्षाच्या वतीने सेनेवर बंदी घालायची मागणी कशी करू शकतात? त्यांचा पक्ष आणि केजरीवाल यांचा पक्ष भिन्न आहे काय? माध्यमातल्या कोणी या प्रितीचे विधान प्रसिद्ध करण्यापुर्वी निदान त्याची खातरजमा करून घ्यायला नको काय? पण पत्रकारिताही पुरोगामी झाली असल्यावर अशी धरसोड अपरिहार्य नाही काय? एका दैनिकाच्या सहसंपादकाने पत्रकारितेच्या केविलवाण्या पुरोगामीत्वाचा किस्सा याच आठवड्यात सोशल मीडियात मांडला. एका गुजराती दैनिकाने गोव्यातील एका साहित्यिकाने आपला पुरस्कार अकादमीला परत केल्याची बातमी छापली आणि शोधाशोध सुरू झाली. तर असा कोणी साहित्यिक गोव्यात नसून ते नाव तिथल्या प्रसिद्ध दारूचे असल्याचे निष्पन्न झाले. पुरोगामी म्हणुन काहीही खुळचटपणा करा की तात्काळ त्याला मोठी प्रसिद्धी कशी दिली जाते, त्याचा हा नमूना! पण अशा पोरखेळातून एक राजकीय विचारसरणी किती दिवाळखोर व हास्यास्पद होत गेली आहे, त्याचा विचारही कोणाला सुचलेला नाही. म्हणूनच मग विचारसरणी नसलेली शिवसेना फ़ोफ़ावत जाऊ शकते आणि राजकारणासाठी वैचारिक भूमिकेची गरज उरलेली नाही, असे सामान्य माणसाला वाटले तर काय नवल? कारण पुरोगामी म्हणून मिरवणार्यांनी त्या विचारसरणीचे पुरते दिवाळे वाजवून टाकले आहे.

No comments:
Post a Comment